संगमनेर (प्रतिनिधी)-- विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील दलितवस्तीतील विविध कामांच्या मंजुरीसाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावे व 250 च्या वर वाडी वस्ती आहेत. या सर्व गावांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या आहेत. याचबरोबर आमदार थोरात निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले आहे. सहकार, शैक्षणिक संस्था, समृद्ध बाजारपेठ ,ग्रामीण विकास,सुसंस्कृत वातावरण यामुळे संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2024- 25 मधील वस्तीनिहाय रस्ता कामांमधून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या अंतर्गत दरेवाडी रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख, घुलेवाडी अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख, जांभुळवाडी रस्ता अंतर्गत क्रॉक्रेटीकरण 10 लाख, अंभोरे अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख, मांडवे बु अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख,वेल्हाळे अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख,शिंदोडी अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख,कासारा दुमाला अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख, हिवरगांव पठार अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख,आश्वी बु अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण 10 लाख असा एकूण 1 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीमधून दलित वस्ती अंतर्गतची रस्त्यांची कामे होणार असल्याने वरील सर्व गावातील नागरिक व दलित वस्ती मधील नागरिकांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.