Friday, 10/01/2025

रमजान ईद निमित्ताने सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने ईदगाह येथे करण्यात आल्या उपाययोजना

ईदगाह येथे सामूहिकपणे होणार नमाज पठण
छत्रपती संभाजीनगर : जयराज चव्हाण, कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
ईद सण अगदी दोन दिवसांवर येवून ठेपला आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी ईदगाह येथे मुस्लिम बांधव सामूहिकपणे नमाज अदा करणार आहेत. त्यानिमित्ताने सिल्लोड नगर परिषद व प्रशासनाच्या वतीने येथे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
रमजान ईद निमित्ताने शहरात सुरळीत पाणी पुरवठा, तसेच वीज पुरवठा व्हावा यासाठी नगर परिषदेने उपाययोजना केल्या आहेत. सोबतच नगर परिषदेकडून  ईदगाह परिसरासह  शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.  तर रमजान ईद सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार म्हणाले. 
पवित्र रमजान ईद सनानिमित्त सिल्लोड येथील मुस्लिम समाजबांधव ईदगाह येथे नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देतात. तसेच मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांची या ठिकाणी गर्दी असते.