अकोला : श्री दिलीप कराळे, विदर्भ संपादक , मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (९०११९८१२९९) :
श्री क्षेत्र वाई येथे दि.३/०४/२०२४ पासून भागवताचार्य हभप गजानन महाराज महल्ले (श्री क्षेत्र कोळसरा) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत व अखंड हरिनाम सप्ताह ला सुरवात झाली.
कार्यक्रमात सकाळी ५.००वाजता काकळा आरती नंतर ९.००ते ११.०० ज्ञानेश्वरी पारायण वाचक हभप श्री गणेश महाराज ठाकरे, श्रीमद भागवत कथा हभप श्री गजानन महाराज महल्ले यांच्या सुमधुर वाणीतून दुपारी २.०० ते ५.०० आणि सप्ताहातील कीर्तन रोज रात्री ८.०० ते १०.००.या वेळेत असतात. गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह गावातील पहिला असल्यामुळे विशेष महत्व आहे.नामसंकीर्तन अखंड हरिनाम ज्ञानेश्वर पारायण सप्ताह गेल्या कित्येक वर्षांपासून श्री संत मूकींदास महाराज यांच्या पुण्यतिथी दिना निमित्त (गुडीपाळवा) सुरू आहे. सप्ताह अखंड सुरू असल्यामुळे याला विशेष महत्व आहे.
ग्राम दैवत श्री संत मुकींदास महाराज पुण्यतिथी महोत्सव वाई येथे सुरु असलेल्या श्रीमद्ग भागवतकथा व अखंड हरिनाम , ज्ञानेश्वरी पारायण मध्ये कीर्तन रूपी सेवा देणाऱ्या महाराज मंडळीना श्री हभप ज्ञानेश्वर महाराज गई संत नगरी शेगाव यांच्या संकल्पनेतून महाराज मंडळीना ग्राम दैवत श्री संत मुकींदास महाराजांचे नाव, विठ्ठल रुख्मिणीचे छायाचित्र असलेले व श्री हभप भागवतकार व कीर्तन रूपी सेवा देणाऱ्या श्री हभप महाराजांचे छायाचित्र नाव असलेले शिल्ड भेट देण्यात येत आहेत.
बुधवार दि.१०/०४/२४ ला हभप श्री गजानन महाराज महल्ले यांचे १० ते १२ काल्याचे कीर्तन राहील व नंतर महाप्रसाद राहील तरी पंचक्रोशीतील जनतेनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक गावकरी मंडळी वाई यांच्या तर्फे केली .