ठाणे : श्री. संकेत सानप - मंत्रालय प्रतिनिधी, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (महाराष्ट्र राज्य) :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहापूर उपतालुकाप्रमुख श्री. किरण जाधव यांच्यासह श्री. देविदास जाधव, श्री. गुरुनाथ सपाट, श्री. हर्षल जाधव, श्री. रोशन शेलार, श्री. श्याम गुजरे, श्री. सुधाकर महाजन, श्री. सुरेश देसले आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये आज प्रवेश केला. सर्वांचे भाजप पक्षात स्वागत करून राज्यमंत्री खासदार कपिल पाटील साहेब यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविजय 2024 साठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले. सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील साहेबांना खासदारकीचे तिकिट मिळाल्याने सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.