हिंगोली : श्री. केशव भालेराव, सहसंपादक-महाराष्ट्र राज्य :
सुरत येथे दिनांक 12 मार्च ते 16 मार्च दरम्यान इस्लाम जिमखाना कोलवड याठिकाणी ऑल इंडिया इंटर क्लब मॅचेस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील खेळाडूंनि आपला सहभाग नोंदविला होता. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य संघा कडून खेळताना धाराशिब, व मुंबई येथील खेळाडूंनी सुद्धा सहभाग नोंदवला होता यामध्ये सौराष्ट्र क्रिकेट क्लब व गुजरात अशा संघांनी सहभाग नोंदवला होता, ऐकून सहा सामने लेदर बॉल न खेळविण्यात आले तयापैकी 3 सामने हिंगोली च्या संघ ने जिंकत आपला ठसा उमटवला त्यामध्ये संघा चा कर्णधार म्हणून उमरगा येथील अष्टपैलू खेळाडू राहुल राठोड याने कर्णधार म्हणून आपली भूमिका बजावळी व उपकर्णधार म्हणून हिंगोली जिल्ह्याचा युवा आष्टपैलू खेळाडू आदित्य सोमोसे याने जबाबदारी पार पडली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत हिंगोली च्या दोन खेळाडूंची निवड विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या नामांकित गजधर ट्रॉफी साठी झाली आहे त्यामध्ये आदित्य सोमोसे व सारांश बलखंडे याचा समावेश आहे, सदर यशा मध्ये हिंगोली येथील क्रीडा प्रशिक्षक शंकर पोघे यांचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल सर्व स्तरातुन त्याच कौतुक होत आहे, महाराष्ट्र संघा कडून कृष्णा वडकुते, मकरंद कुलकर्णी, साहिल चव्हाण, सारांश बलखंडे, विराज उंबरकर, शुभम क्षीरसागर, राहुल राठोड आदी खेळाडूंनी सहभाग नोंदवून जबरदस्त कामगिरी केली आहे त्याबद्दल प्रशिक्षक पोघे सर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. अशा स्पर्धा मध्ये खेळादूंना सहभाग नोंदव्हायचा असेल तर त्यांनी पोघे सर याच्याशी संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले.