Friday, 10/01/2025

जिद्द आणि चिकाटी जोरावर शेतकऱ्याचा मुलगा बनला कनिष्ठ लेखा अधिकारी

छत्रपती संभाजीनगर : श्री. जयराज चव्हाण, कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य :

सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील रहिवासी असलेले सुरेश मधुकर गाढेकर यांची पालघर जिल्हा परिषद च्या कनिष्ठ लेखा अधिकारी या पदावर निवड झाली आहे .सुरेश गाडेकर नी त्यांचे बि कॉम पदवीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर मधील विवेकानंद महाविद्यालय मधून पुर्ण केले व तसेच त्यांनी त्यांची एम कॉम हि पदव्युत्तर पदवी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य विभाग छ संभाजीनगर मध्ये पूर्ण केली आणि सध्या त्यांची प्रो फराह नाझ गौरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विषयात पी एच डी चालू होती आणि त्यांना शिष्यवृत्ती मंजूर नसल्यामुळे खुप हताश होवून स्पर्धा परीक्षा सुरू केली आणि खूप अभ्यास करून   जिद्दी चिकाटीने आज रोजी त्याला यश प्राप्त झाले आहे . आई-वडिलांच्या हलकीच्या परिस्थितीची जाण ठेवत. मुलाने मिळवले यश गावकऱ्यांनी गावातून मिरवणूक काढण्यात आली. नातेवाईक आणि सर्व मित्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.