Friday, 10/01/2025

महामार्गास तातडीने मंजुरी द्यावी - खा. भाऊसाहेब वाकचौरे

मुंबई : संकेत तुकाराम सानप, मंत्रालय प्रतिनिधि,  मो. नं. 8999404688

शेवगाव –भेंडा कारखाना –नेवासा –श्रीरामपूर –बाभलेश्वर  लोणी –संगमनेर –अकोला –शेंडी यांना जोडणारा शहापूर येथे  NH-८४८ (जुना NH-३)सह जंक्शनवर समाप्त होणारा गेवराई जवळील NH-52 (जुना NH-२११) वर महामार्गास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार भाऊसाहेब  वाकचौरे यांनी रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री  श्री नितीन गडकरी  यांची समक्ष भेट घेऊन लेखी  निवेदनाद्वारे केली .सदर निवेदनात त्यांनी  NH-52 (जुना) च्या जंक्शन पासून सुरु होणारया विद्यमान  राज्य महामार्गाला (SH 50 ) राष्ट्रीय महामार्ग म्हणून जोडणे बाबत सदर  प्रस्तावाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली. सदर महामार्गामुळे बीड ,अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव ,नेवासा ,श्रीरामपूर ,संगमनेर ,अकोले या तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील शहापूर जोडले जाणार आहे . याबाबत मंत्री महोदय  श्री गडकरी यांनी  सकारात्मकता दाखवून तातडीने कार्यवाही करणेबाबत निर्देश दिलेत. याबद्दल  सडक व परिवहन मंत्री  श्री नितीन गडकरी  यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी  आभार मानले.