शेख ख्वाजा रशीद, संपादक-वैजापूर तालुका, मो. नं. 9049892281
तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग वैजापूर यांच्यावतीने दिनांक एक जुलै रोजी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिनाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात पार पडला
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव व प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सुनील सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी केले त्यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे शेतीविषयक कार्याची माहिती दिली व शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले
तहसीलदार सुनील सावंत यांनी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीचे उत्पादन वाढवून कुटुंबाचे उत्पन्न वाढविणे बाबत शेतकऱ्यांना सुचविले.
कृषी पर्यवेक्षक दत्तात्रेय पुंड यांनी कापूस व मका पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन करताना जैविक कीडनाशकाचा वापर करण्याविषयी माहिती दिली.
कृषी पर्यवेक्षक माधव गांगुर्डे यांनी पावसाच्या अनियमितमुळे आपत्कालीन पीक व्यवस्थापन व संरक्षित पाणी ठिबक व तुषार चा वापर करून उत्पादन कसे वाढविता येईल त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतावर शेततळे करावे असे आवाहन केले
उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी कृषी दिनाचे महत्त्व, कृषी विद्यापीठांची स्थापना ,हरितक्रांती ,संकरित बी बियाणे खते कीटकनाशके यांचा वापर तसेच पावसाचा खंड पडल्यास हायड्रोजनचा वापर शेतात करून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते तसेच शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा व त्यासाठी मुरघास बनवून दुग्ध उत्पादन वाढविणे विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञान वापरणारे शेतकरी ज्यामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान वापर करणारे नवनाथ मोगल, रेशीम उद्योग करणारे संजय मोकाटे, शेडिंग नेट मध्ये भाजीपाला उत्पादन घेणारे राकेश बहिरट व तालुक्यात कोहळा लागवड करून उत्पादन घेणाऱ्या सुरेखा पवार या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके यांनी केले कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी अशोक बिनगे, श्याम पाटील, रवि वराडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पुरी, देशमुख, रॉयल धुळे तसेच कृषी पर्यवेक्षक दत्ता पेदे, आदिनाथ सपाटे, आदेश गायकवाड, किरण भुजबळ कृषी सहाय्यक राजेंद्र थोरात ,संदीप जाधव, अविनाश पैठणकर, ज्ञानेश्वर कोल्हे, जगदीश गवळी, कृष्णा सरोवर,मीना पंडित, अंजली सोनवणे, अर्चना सोनवणे, उर्मिला जेजुरकर, रूपाली देशमुख, काजल बस्ते,सिंधू बाविस्कर, वनिता खडके, सविता पंडुरे, विद्या पालवे, सोनाली महाले, प्रसाद शिंदे, पंकज साठे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते