Friday, 10/01/2025

प्रत्येक गावात आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे : ठाणेदार विजयानंद पाटील

गोंदिया : मच्छिंद्र गोंडाणे, संपादक-गोंदिया जिल्हा : (मो. ९४२३३८४०९०) :
निवडणुकी दरम्यान प्रत्येक गावातील राजकीय पुढारी ,मतदार यांनी गावात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील व शांततेत पार पडण्याची जबाबदारी गाव पातळीतील प्रशासन ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांनी जोपासावी असे प्रतिपादन अर्जुनी मोरगावचे ठाणेदार विजयानंद पाटील यांनी  ग्रामपंचायत कार्यालय इटखेडा येथे ग्रामभेटी दरम्यान केले.
याप्रसंगी ग्रा.पं.इटखेडाचे सरपंच सौ. आशाताई झिलपे, गावचे पोलीस पाटील विकास लांडगे , म गांधी तंमुस चे  अध्यक्ष श्री अभिमन लोणारे यांनी स्वागत केले.यावेळी ग्रा.पं.चे व महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते .