अहमदनगर : श्री. महेंद्र मगर, उपसंपादक- अहमदनगर जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच : (मो. ९६५७१४४१९७)
आज दि. १४ एप्रिल रोजी जामखेड शहरातील विविध ठिकाणी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रा. मधुकर राळेभात, आयोजक प्राचार्य विकी घायतडक, राजेंद्र कोठारी, उप महाराष्ट्र केसरी बबन काशिद, दत्तात्रय वारे, नगरसेवक मोहन पवार, प्रा. कैलास माने, सलिम बागवान, ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले, प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात, सागर सदाफुले, योगीराज घायतडक, बापूसाहेब गायकवाड, राजेंद्र गोरे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव, पवन राळेभात, शामीर सय्यद, संतोष गव्हाळे, सुरेखा सदाफुले, संध्या सोनवणे, बौध्दाचार्य अशोक आव्हाड, गोकुळ गायकवाड, दिपक सदाफुले, गौरव कांबळे, सुकेंद्र सदाफुले, अनिल सदाफुले, अमोल सदाफुले, कबीर घायतडक, गौरव सदाफुले, राणा सदाफुले, गितराज सदाफुले, शुभम घायतडक, रोहित राजगुरू, अजित घायतडक, सुमित घायतडक, प्रितम घायतडक, बाळा सदाफुले, शिवाजी गायकवाड, प्रा. राहुल आहिरे,
गौतम सदाफुले, हरिभाऊ आजबे, उमर कुरेशी, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, लक्ष्मण सदाफुले, सचिन सदाफुले, सुरज डाडर, शिवाजी काळदाते, सचिन मोकाशे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेड शहरातील संविधान चौक येथे प्रा. विकी घायतडक मित्र मंडळाच्या वतीने तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या उपस्थितीत तसेच सिद्धार्थ नगर, सदाफुले वस्ती, मिलींद नगर, आरोळे वस्ती, S.T आगार, भारत टाईपिंग कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मोहन वस्ताद मित्र मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, नालंदा बौद्ध विहार आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले. तसेच सिध्दार्थ नगर येथे तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विकी घायतडक मित्र मंडळ वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य विकी घायतडक यांनी केले तर आभार गौरव सदाफुले यांनी मानले.