अमृतवाहिनी च्या विद्यार्थ्यांना मलेशियात संशोधनासाठी मोठा फायदा
संगमनेर (प्रतिनिधी)--मा. शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील अमृतवाहिनी डी फार्मसी महाविद्यालयाने नुकताच मलेशिया येथील सायबरजिया विद्यापीठाबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला असून यामुळे अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना संशोधना बरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संधी मिळणार आहे.
अमृतवाहिनी डी फार्मसी महाविद्यालयात नुकतीच आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न झाली असून यावेळी मलेशिया येथील सायबरजीया विद्यापीठाशी सामंजस्य करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सायबरजीया विद्यापीठाच्या डॉ.नुर बिनतीजहरी, सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ मनोज शिरभाते ,अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे बी गुरव, अहमदाबाद मेडिकल कंपनीचे डॉ मिहिर घारिया, इंडोनेशियाचे द्वि मारलीना शोऊकरी, डॉ. आसिफ सौफीरहमान, सिंगापूरचे महेंद्रकुमार राय, अमेरिकेचे निरनिथ द्वी, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय करारामुळे अमृतवाहिनी डी. फार्मसी मधील विद्यार्थी व शिक्षक यांना मलेशिया येथील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यास दौरा, संशोधन व विकासकार्य यासाठी मोठा फायदा होणार असून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
यावेळी बोलताना मा आमदार डॉ तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे उच्च शिक्षणाचे केंद्र झाले आहे. अमृतवाहिनी संस्थेने आपल्या गुणवत्तेमुळे देश पातळीवर लौकिक निर्माण केला असून मलेशियातील विद्यापीठाबरोबर झालेल्या कराराने या महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
तर मलेशिया येथील विद्यापीठाच्या डॉ नूर बिणती यांनी म्हटले आहे की, अमृतवाहिनी चे महाविद्यालय भारतातील ग्रामीण भागात असूनही संशोधनवृत्तीस वाव मिळावा याकरता या संस्थेने राबवलेला उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद आहे. स्वच्छ हिरवाईचा परिसर, दर्जेदार शैक्षणिक सुविधा, आणि आधुनिक प्रणालीचा वापर यामुळे नक्कीच मलेशियातील विद्यार्थ्यांनाही संगमनेर मध्ये येऊन भारतातील मेडिकल संशोधनाचा लाभ घेता येणार आहे.
यावेळी तर डॉ मिहिर घरिया या म्हणाल्या की ,फार्मासिटिकल ऍडव्हान्समेंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्त्वाचे ठरणारे आहे. यावेळी अमेरिकेचे निरनिथ द्वीरेडी ,सिंगापूरचे महेंद्र कुमार रॉय, आणि सह विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या दोन दिवशी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील 400 हून अधिक विद्यार्थी ,प्राध्यापक, पीएचडी स्कॉलर्स, इंडस्ट्री मधील व्यक्ती व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पेपर प्रेझेंटटेन्स सह विद्यार्थ्यांनी तज्ञांना विचारलेल्या विविध प्रश्नांमधून संशोधनाच्या अनेक वाटा निर्माण झाल्या.
अमृतवाहिनी डी फार्मसी ने मलेशियातील विद्यापीठाशी केलेल्या कराराबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात ,मा आमदार डॉ सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, सौ शरयू ताई देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ मनोज शिरभाते आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..
Friday, 10/01/2025