पुणे : विजय जोंधळे (संपादक)/ राजेंद्र निमसे (सह-संपादक) पुणे जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते म्हणून दिलीप वळसे पाटील यांना ओळखलं जातं. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांना पुण्यातील एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री लाईट सुरु करायला जात असताना वळसे पाटील खाली पडले, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनूसार (27 मार्च) रोजी रात्री, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) घरी असताना रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात होते या वेळेस ते पाय घसरुन पडले. वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.