Friday, 10/01/2025

कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक करीत गाईंना घेवून जाणाऱ्या टेम्पो मालकाला 1,27,100 रू खावटी देण्याचा आदेश

श्री. समाधान जोगदंड, सहसंपादक- महाराष्ट्र राज्य, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :

केज पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीमध्ये 20 मुक्या जीवांना आईशेर टेम्पो मध्ये दाटीवाटीने कत्तलिसाठी नेहण्याच्या उद्देशाने भरले होते यात 14 लहान वासरे  व 6 मोठे  गाई बैल भरून जात असताना पकडले , त्यांनतर गुन्हा नोंद करून सदर पशुधन  गोशाळेत पुढील आदेशापर्यंत सोडण्यात आले . केज न्यायालयात टेंपो मिळावा म्हणून टेम्पो मालकांनी अर्ज दाखल केला असता मा न्यायालयांनी टेम्पो मालकास जप्त पशुधनाच्या संगोपन, संवर्धन खर्च हा 1,27,100 रु देण्याचा आदेश केला. अन्यथा सबब खर्च लोकल अथॉरिटी ऑफ अरियरास ऑफ लैंड रेवेनिव्यू प्रमाणे वसूल करण्यात येईल.तसेच सबब खर्च जोपर्यंत जमा नाही केला जात तोपर्यंत टेम्पो हा पोलिसांकडे जमा राहील असा आदेश केला असून यात सरकार पक्षातर्फे ऍड देशपांडे व गोशाळेच्या वतीने  ऍड अशोक मुंडे यांनी काम पाहिले .