गोंदिया : श्री. मच्छिंद्र गोंडाने, संपादक- गोंदिया जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (मोबाईल नंबर - 9423384090) :
भंडारा-गोंदिया जिल्हे निसर्गरम्य आहेत.त्यामुळे जल जमीन जंगल याचा विकास होणे गरजेचे आहे. या जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.सिंचनासाठी पाणी ही प्रमुख समस्या आहे. विज सध्या परवडणारी नाही. त्यासाठी भारत सरकारनी सौरऊर्जा प्लॅन तयार केला आहे. सोलरच्या माध्यमातुन पाणी समस्या मिटवा,भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे.
मदर डेअरी च्या माध्यमातुन दुधाला भाव उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.दुधापासुन तयार होणारे पदार्थ नागपुर येथे तयार होत आहेत.शेतकरी हा अन्नदाता नाही तर उर्जादाता आहे. अर्जुनी मोर. तालुक्यातील झासिनगर उपसा सिंचन योजना पर्यावरण कायद्यामुळे अडकली असे समजले आहे. निवडणुक झाल्यानंतर या उपसा सिंचन योजनेला मार्गी लावु,धानाच्या तनस पासुन डांबर निर्मीतीचे स्वप्न साकार होत आहे,इथेनाल चे कामही प्रगती पथावर आहे,आपन अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहे.ते केवळ मतदारांच्या आर्शीवादामुळे, ४०० पार नंतर संविधान बदलविणार अशाप्रकारचे विष विरोधक पसरवित आहेत.मात्र गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारने संविधानानुसारच भारताला जगाच्या नकाशात शक्तीशाली भारत बनवीले आहे.
उलट काॅग्रेस नेच ८० वेळा संविधानात बदल केला आहे. मतदार मालक आहेत. आम्ही सेवक आहोत.त्यामुळे जनतेची सेवा निस्वार्थपणे करा, तसेच भारताच्या उज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा केंद्रात भाजपा चे सरकार आणण्यासाठी व मोदींजींना तिस-यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचंड मतानी विजयी करा असे आवाहन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल अर्जुनी मोर. येथील प्रांगणात ता.७ महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचे प्रचारार्थ आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. प्रचार सभेला उमेदवार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री डाॅ. परिणय फुके, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन,बाळाभाऊ काशिवार, डाॅ.हेमकृष्ण कापगते, नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे,गंगाधर परशुरामकर, यशवंत परशुरामकर, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, विजय कापगते, जेष्ठ नेते नामदेव कापगते, केवळराम पुस्तोळे, लायकराम भेंडारकर, रचनाताई गहाणे, लक्ष्मीकांत धानगाये, वीरेंद्र अंजनकर, संजय भेंडे, चामेश्वर गहाणे, अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील सर्व जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य तथा भाजपा,शिवसेना, राष्टवादी काॅग्रेस, पिरिपा व महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उमेदवार सुनील मेंढे,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, डाॅ. परिणय फुके, माजी मंत्री राजकुमार बडोले, राजेंद्र जैन यांनीही सभेला मार्गदर्शन करुन महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना भरघोस मतानी निवडुन देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी संचालन रचनाताई गहाणे तर आभार लायकराम भेंडारकर यांनी केले. प्रचार सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.