मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्यसरकार कडून मदत मिळवून देणार : मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजीनगर (रवि शिकारे) :
शहरातील छावणी परिसरात बुधवारी 3 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता अचानक एका कपड्याच्या दुकानीला आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातील सात व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी सकाळी छावणी परिसरातील घटना स्थळी भेट दिली. यावेळी मंत्री सावे यांनी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून मृत व्यक्तींच्या परिवाराला या घटनेतून सावरण्याचे बळ मिळो तसेच राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जाईल. या संदर्भात आपण स्वतः जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरध्वनी वरून संपर्क केला असल्याची माहिती मंत्री श्री अतुल सावे यांनी प्रसार माध्यमांना दिली. या घटनेत लवकरात लवकर मदत कशी मिळेल याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितले.
या आगीत 3 महिला, 2 लहान मुले आणि 2 पुरुष यांचा समावेश आहे.