Friday, 10/01/2025

कर्जत-जामखेड मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जामखेड तालुक्याच्या राजकारणातुन रोहीत पवारांना जोरदार धक्का

अहमदनगर : श्री. महेंद्र मगर, उपसंपादक- अहमदनगर जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वाची समजली जाणारी ग्रुप ग्रामपंचायत मोहा येथील विद्यमान सरपंच भिमराव कापसे यांचा ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो समर्थकांसह आमदार प्रा राम शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टित जाहीर प्रवेश. मोहा ग्रा पं मा,भिमराव कापसे यांचा भाजप प्रवेश रोहीत पवारांसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय. गेल्या वर्षभरात रोहीत पवारांच्या मनमानीला कंटाळुन अनेकांनी भाजपाची वाट‌ धरली आहे.
 गेले कित्येक वर्षे कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचं अस्तित्व टिकवण्यासाठी कष्ट घेणाऱ्या दिग्गज नेत्यांना,कार्यकर्त्यांना गेल्या तीन साडेतीन वर्षात अनेकवेळा पक्षातचं मनमानी,हुकमशाही पध्दतीचा सामना करावा लागत होता, मतदारसंघात नवीन आलेल्या व्यक्तीला निवडुण आणण्यातही याचं पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भुमिका पार पाडली होती पण नंतरच्या काळात या पदाधिकाऱ्यांचं महत्व कमी केलं गेलं,त्यांना विचारात घेतल जातं नव्हत,पक्षाचं अस्तित्व टिकवण्यापासुन ते वाढविण्यापर्यंत कष्ट घेतलेल्या सर्वसामान्य लोकांनाही पक्षात किंमत दिली जात नाही फक्त घराणेशाहीचाच उदोउदो करावा लागत होता ही गोष्ट लक्षात आल्याने आज मोहा गावचे विद्यमान सरपंच,मा भिमराव कापसे,ग्रा ,पं सदस्य मा विकास सांगळे,ग्रा पं सदस्य मा पंडीत गायकवाड,ग्रा पं सदस्य मा विनोद इंगळे,ग्रा पं सदस्य मा पांडुरंग देडे आणि शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टित जाहीर प्रवेश केला.
यावेळी मोठ्या संख्येने जामखेड भारतीय जनता पार्टी चे सर्व ,पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.