Friday, 10/01/2025

दुचाकी घसरुन एका कामगाराचा मृत्यू

पुणे :  विजय जोंधळे (संपादक)/ राजेंद्र निमसे (सह-संपादक) पुणे जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
 आज दि. 28 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकी घसरून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. आळंदी फाटा-चाकण लगत पुणे नाशिक महामार्ग स्पायसर कंपनीजवळ दुचाकीस्वार ट्रक खाली येऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी ॲम्बुलन्स बोलावून वाय. सी. एम. पिंपरी चिंचवड येथे दवाखान्यात पाठविले असता कामगारास मृत घोषित करण्यात आले.
 चाकण ते भोसरी दरम्यान ट्रॅफिकची समस्या फार दिवसांपासून भेडसावत आहे. दोन ते तीन ट्रॅफिक पोलीस असून सुद्धा ट्रॅफिक कंट्रोल होत नाही याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. असे किती सामान्य नागरिकांचे मृत्यू होणार आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ट्रॅफिक नियंत्रण ठेवावी अशी मागणी सामान्य जनता करीत आहे.