Friday, 10/01/2025

सिल्लोडचे ग्रामदैवत श्री. म्हसोबा महाराज यांचा यात्रा महोत्सव

छत्रपती संभाजीनगर : जयराज चव्हाण, कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
सिल्लोडचे ग्रामदैवत श्री. म्हसोबा महाराज  यांचा यात्रा महोत्सव  मंगळवार ( दि.30) पासून सूर होत आहे. त्याअनुषंगाने यात्रा उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अब्दुल समीर यांनी सोमवार ( दि29 ) रोजी मंदिर व परिसरात उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना व सुविधांची पाहणी करून आढावा घेतला. 
दरम्यान यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने पदाधिकारी तसेच विविध समितींच्या सदस्यांसाठी करण्यात आलेल्या ओळखपत्राचे वाटप देखील अब्दुल समीर यांच्याहस्ते करण्यात आले.
यात्रा उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी उत्सव समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी प्रभावी नियोजन करावे असे आवाहन अब्दुल समीर यांनी यावेळी केले. यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने उत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून उत्सव समिती यात्रेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. भाविक भक्तांना नवसपूर्ती , दर्शन व यात्रा उत्सवासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना कुठल्याही प्रकारची अडीअडचण भासणार नाही यासाठी काळजी घेण्यात येत असल्याचे अब्दुल समीर म्हणाले.
यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी राजेंद्र  बन्सोड, नंदकिशोर सहारे, प्रताप प्रशाद, दत्ता शेजुळ, बाबुराव वाकडे, पांडुरंग दुधे,  जगन्नाथ कुदळ, ज्ञानेश्वर कुदळ, सुनील दुधे, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, अशोक बन्सोड, पांडुरंग डवणे, संजय मुरकुटे, सखाराम आहिरे, फहिम पठाण, लखन ठाकूर, दीपक वाघ, शिवा टोम्पे आदींसह श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य गावकऱ्यांची उपस्थिती होती.