पुणे : भीमा कांबळे, उपसंपादक- पुणे जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने भोसरी विधानसभेतील विविध पदांच्या महत्त्वाच्या नियुक्त्या शहराध्यक्ष नितीनभाऊ गवळी यांच्या नेतृत्वात काल शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी सायंकाळी ८ वाजता कुदळवाडी ज्या ठिकाणी करण्यात आल्या.भोसरी विधानसभेचे अध्यक्षपदी अमीरभाई खान यांची निवड करण्यात आली. यावेळी युवा आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी बोलत असताना 'येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी निर्णयाक भूमिका घेऊन युवकांच्या ताकदीचे प्रदर्शन करेल व भोसरी विधानसभेतील भाजपाला मोठा धक्का देईल' अशी भूमिका शहराध्यक्ष नितीन भाऊ गवळी यांनी मांडली.
यावेळी शहराचे महासचिव सुनील जावळे यांनी आपली भूमिका मांडत शहराध्यक्षांनी व्यक्त केलेला भूमिकेवर पूर्ण शहर ताकतीने काम करून सत्यात उतरवेल असा विश्वास आपल्या भूमिकेतून दर्शवला.
तसेच सातत्याने मुस्लिम दलित आणि वंचितांच्या विरोधात भूमिका घेऊन सरंजामी हिंदुत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या आमदाराला यावेळी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार चितपट करेल त्यासाठी लागणारी ताकद सक्षमपणे उभ्या करण्याच्या कामाला आजपासूनच सुरुवात झाली आहे असे मत शहर संघटक प्रमोद क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने शहराध्यक्ष नितीन भाऊ गवळी यांच्या नेतृत्वात भोसरी विधानसभेतून महाराष्ट्रातील पहिला धक्का भाजपाला वंचित बहुजन आघाडी देईल त्यासाठी जीवाचे रान करू आणि वंचितांचा आवाज मतपेटीतून बुलंद करू असा विश्वास प्रसिद्ध प्रमुख बुद्धभूषण अहिरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराचे उपाध्यक्ष राहुल बनसोडे यांनी केले. याप्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदाताई बनसोडे यांनी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा बहाल केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी भोसरी विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष आमिर भाई खान यांनी दिलेल्या जबाबदारीला न्याय देऊ असे आश्वासित करून सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी शहराचे उपाध्यक्ष राहुल ठाणगीर,कुदळवाडी शाखाध्यक्ष संजू निर्मळ,सचिव विजय शिंदे, उपाध्यक्ष नितीन कांबळे तसेच उपाध्यक्ष अमित राजपूत यांच्यासह मुस्लिम कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या संख्येत होता.