अहमदनगर : श्री. महेंद्र मगर, उपसंपादक- अहमदनगर जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
30 एप्रिल 2024 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी ता. जामखेड जि. अहमदनगर येथे वंचितांचे धनाजी व संताजी (आबा/सर) यांनी प्रचार लढ्याचे नियोजन केले. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. दिलीपजी खेडकर साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून नारळ फोडून भंडाऱ्याची उधळण करून सुरुवात करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या सर्व ओबीसी, वंचित, भटके विमुक्त, आदिवासी, मुस्लिम, गरीब शेतकरी, अल्पसंख्यांक अशा सर्व कार्यकर्त्यांना प्रचाराविषयी मार्गदर्शन केले.
वंचितचे नेते ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव यांनी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले की वाडी, वस्त्या, गाव शहर पिंजून काढा. मा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद मजबूत करा. जोरदार घोषणा देऊन मा. श्री. दिलीप खेडकर साहेब यांचे तोफा उडवून हलकी वाजवून चौंडी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी प्रा. किसन चव्हाण सर (महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) ॲड. डॉ. अरुण आबा जाधव (महाराष्ट्र राज्य समन्वयक वंचित बहुजन आघाडी) महादेव बांगर सर, शेख प्यारेलाल भाई (शेवगाव) तालुका वंचित बहुजन आघाडी), अरविंद साळवे, मा.आतिश (दादा) पारवे (जामखेड तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) सोमनाथ भैलुमे, अजिनाथ शिंदे (शहर अध्यक्ष जामखेड) वैजीनाथ केसकर, संतोष चव्हाण, केशवराव खेडकर, मनोज कुमार खेडकर, प्रथमेश बांगर, द्वरका पवार, तात्या आकाश जाधव, अशोक रणदिवे, तुकाराम पवार, नंदकुमार गाडे, मुस्तफा मदारी, रज्जाक मदारी तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.