Friday, 10/01/2025

श्री सिद्धेश्वर निघाले नाथांच्या भेटीला,श्रीनाथषष्टी उत्सवासाठी पालखी रवाना

छत्रपती संभाजीनगर : श्री. जयराज चव्हाण, कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य :

सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा, तालुका सिल्लोड येथील श्रीसिद्धेश्वर महाराज देवस्थान तर्फे पैठण येथील नाथषष्टी  महोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे पालखी महोत्सव पैठण कडे निघाला. या पालखी महोत्सवाचे हे 47 वे वर्ष असून दरवर्षी या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून ही दिंडी दिनांक 21-3- 2024 श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा इथून निघून दिनांक 30-3-2024 रोजी पैठण येथे पोहोचणार आहे.सिद्धेश्वर संस्थांतर्फे या दिंडीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते दिंडी धोत्रा येथून निघाल्यानंतर गोळेगाव, लिहा खेडी ,सिल्लोड ,आळंद, फुलंब्री ,चौका, छत्रपती संभाजीनगर, कांचनवाडी, बिडकीन, ढोरकीन व नंतर पैठण अशा मार्गाने जाणार असून ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत सिद्धेश्वर भक्ता तर्फे करण्यात येते.तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ, चहा ,नाष्टा व भोजनाचीही व्यवस्था भक्तां तर्फे ठिकठिकाणी करण्यात येते .या दिंडीमध्ये पंचक्रोशी सह तालुक्यातील, जिल्ह्यातील व महाराष्ट्रभरातील भाविक सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. दिंडी चालक श्री सांडू सिंग सुखदेव जाधव, योगी रवी नाथ महाराज, आर डी जाधव, गोपाल सिंह जाधव ,भगवान सिंग जाधव, धनराज जाधव ,राजू जाधव,दीपक जाधव,विनायकराव देवकर ,अहिलाजी महाराज ,तानाजी महाराज जळकी बाजार ,दिनेश सुरासे,जयवंत कोल्हे,महिला भाविक ,श्री सिध्देश्वर महिला भजनी मंडळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात भजनी मंडळ भाविक यांची उपस्थिती राहते.दिंडीला पैठण कडे रवाना करण्यासाठी गावकर्यां तर्फे तुकाराम जाधव, महेश महाराज, शुभाष जाधव,मानसिंग जाधव,जिवनसिंग जाधव, मुक्ताराम गव्हाणे ,मधुकर जाधव ,ईश्वर सिंग जाधव, भगतसिंग जाधव ,कोमल सिंग जाधव ,प्रवीनसिंग जाधव,आनंदसिंग जाधव, विशालसिंग जाधव, दिपकसिंग जाधव,युवराजसिंग जाधव,नितेशसिंग जाधव,गजानन जाधव,सचिन बावसकर,गोपाल जाधव,ऋषिकेश सूरासे, संतोष जाधव, मंगलसिंग जाधव,विजयसिंह जाधव,नंदुसिंग जाधव,वैभव जाधव,गणेश जाधव,ईश्वर सिंग जाधव,सुधाकर जाधव,विशोक जाधव,समाधान सूरसे,  यांच्यासह गावकरी उपस्थित होते.दिंडीत बाळापूर, पानस, डिग्रस, खंडाळा,हिसोडा, दहिगाव, तोरनाळा, खुपटा,जळकी बाजार, मादणी, धोंडखेडा,जळगाव सपकाळ, गोळेगाव सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती पैठण पर्यंत दिंडी पोहोचता पोहोचता जवळपास चार ते पाच हजारांचा भक्त वर्ग या दिंडीमध्ये सहभागी होतो. यंदा अतिशय उत्साहात भाविक या दिंडीत सहभागी झाले आहेत.