अकोला : दिलीप कराळे, विदर्भ संपादक मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच, संपर्क -९०११९८१२९९ :
अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अकोला पश्चिमचे आमदार दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर ही जागा गेल्या काही महिन्यांपसून रिक्त आहे. या ठिकाणी कोणत्याही पक्षाने अद्यापही आपले उमेदवार जाहीर केले नाही. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर्फे नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली.
राजेश मिश्रा हे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेत असून मा. उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ आहेत. तसेच १५ वर्षांपासून नगरसेवक आहेत.