Friday, 10/01/2025

आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील पाणीटंचाई बाबत तातडीने निर्णय - जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे

ठाणे : श्री. संकेत सानप - मंत्रालय प्रतिनिधी, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (महाराष्ट्र राज्य) : 
आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील पाणीटंचाई बाबत जिल्हाधिकारी श्रीमती. दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांची भेट घेऊन सुरेश आण्णा धस यांनी सकारात्मक चर्चा केली, असता जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीने योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. 
यामध्ये प्रामुख्याने पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी साठवण तलावातील बंद केलेले वीज कनेक्शन जोडण्यात यावे, तसेच बेदरवाडी (कोतन) साठवण तलावातील उपलब्ध पाणीसाठा व प्रशासनाने वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश याबाबत विनंती करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणेबाबत विनंती केली.
मौजे. महासांगवी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाण्याचा उपसा व पाटोदा शहराला होणारा पाणीपुरवठा याबाबत भविष्यातील टंचाई यावर चर्चा केली.तसेच धनगर जवळका तलावातुन पारनेर गावातील कृषी पंपाची तोडलेले कनेक्शन जोडण्यात यावेत यासाठी विनंती केली.
शिरुर कासार तालुक्यातील गावांना निर्माण झालेली पाणीटंचाई आणि शहरांत होणारा पाणीपुरवठा याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केली.
तसेच सिंदफना प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्यासाठी विनंती केली कारण शेतकऱ्यांनी पेरलेली उन्हाळी बाजरी आता फुलोऱ्यात आलेली आहे त्यामुळे पाण्याची आवश्यकता आहे.
आष्टी तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा याबाबत आकडेवारी लक्षात घेऊन पाणीउपसा बंद करण्यासाठी  सरसकट वीज  पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे.