Friday, 10/01/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या जल्लोसात साजरी

जिंतूर : श्री. शुभम एस. तारु, संपादक-जिंतुर तालुका, मो. ८००७७३५८१६

विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्ताने फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच जिंतूर व गोर बंजारा समाज बांधवांच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त वरूड नृसिंह चौक जिंतूर शहरात दि. 14 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता पार पडले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरीक्षक बुध्दिराज सुकाळे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी शिंदे सोसकर, बाबाजी शिंदे माजी सैनिक, डॉ. प्रा. विजय पवणे, सुरेखा शेवाळे टाले, बाळासाहेब काजळे, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद, अशोक वानखेडे, बळीराम उबाळे, रावसाहेब हरबरे, अजमत पठाण, महेश देशमुख, सुर्यवंशी, बालाजी सांगळे, गोपीनीय शाखेचे कर्मचारी अमीत शिराळकर, रफिक तांबोळी, पो.उप.नि.मैहेतरे, सतिष वाकळे,उमेश चव्हाण , खुशालराव घुगे , शाम मते, रहिमभाई, बाबा खान, काकडे सर, सोपान धापसे अदी यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अमोल चव्हाण, पवन प्रधान , पप्पू चव्हाण, आंशीराम चव्हाण, निवृत्ती गहिरे, राहुल वाकळे, लक्ष्मण थिटे, प्रविण कांबळे, संदेश ननवरे, शिवाजी चव्हाण,शुभम तारू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असुन फुले शाहू आंबेडकर विचार मंच जिंतूर व गोर बंजारा समाज बांधव समीतीचे आयोजक जयंती उत्सव समिती शरद सुदामराव चव्हाण व संजय रामराव आडे सामाजिक कार्यकर्ते जिंतूर यांनी आभार मानून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा नगरपरिषद जिंतूर येथे अभिनंदन केले.