शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना 851 कोटींचा व्यवसाय
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह. बँकेची आर्थिक वर्षांमध्ये भरीव कामगिरी
शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना 851 कोटींचा व्यवसाय
संगमनेर (प्रतिनिधी)-- मा. कृषी व महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक ,व्यापारी, सभासद व ठेवीदार यांच्या विश्वास सार्थ ठरविताना सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने मागील आर्थिक वर्षात 851 कोटी रुपयांचा व्यवसाय करताना भरीव आर्थिक कामगिरी केली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली आहे.
31 मार्च 2024 आर्थिक वर्षाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्व जपताना बँकेने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी ,सभासद यांचे हित जोपासले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये लहान शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता दुग्ध व्यवसाय कर्ज योजनेतून गाई खरेदी करता एक ते दीड लाख रुपयांची कर्ज उपलब्धता करून दिली आहे. याचबरोबर भाजीपाला व शेती व्यवसायासही मोठी मदत केली आहे.
चालू आर्थिक वर्षात बँकेने एकूण 851 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून यामध्ये 507 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर 334 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे वर्षाखेरीस बँकेला 9.17 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून 2 कोटी 51 लाख रुपयांचा निवळ नफा मिळाला आहे.
याचबरोबर बँकेने गेल्या आर्थिक वर्षांमध्ये आश्वी आणि संगमनेर खुर्द या ठिकाणी नवीन शाखा सुरू केल्या असून शहरातील नेहरू चौक येथील शाखा मेन रोडवर स्थलांतरित केली आहे. याचबरोबर येणारे आर्थिक वर्षांमध्ये दोन नवीन शाखांसह दोन नवीन एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
तसेच सर्व ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देताना सर्व सभासदांचा दोन लाख रुपयांचा अपघाती विमा सुद्धा उतरवला आहे. बँकेच्या या सर्व वाटचालीत बँकेचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, चेअरमन सुधाकर जोशी ,व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
बँकेच्या या यशस्वी कामकाजाबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात , बाजीराव पा. खेमनर, ॲड माधवराव कानवडे, शंकरराव खेमनर ,संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..
आप्पासाहेब पाटील महामंडळातूनही बेरोजगारांना योजना
तालुक्यातील युवक व बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्धता यावी याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या माध्यमातून आप्पासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ही सुधाकर जोशी यांनी दिली आहे. याचा लाभ तालुक्यातील अनेक तरुणांनी घेतला असल्याचेही ते म्हणाले
Friday, 10/01/2025