धुळे लाचलुचपुत प्रतिबंध विभागाची कामगिरी
धुळे : श्री. अमित चौधरी, उपसंपादक- धुळे जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक उपशिक्षिकेकडून 1000 लाच स्वीकारताना रंगेहाथ मिळून आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कामगिरी केली.
कुसुंबा येथील सोशल ऍण्ड कल्चरल असोसिएशन, कुसुंबे संचालित आदर्श हायस्कूलमध्ये ऐक उपक्रम राबविण्यात आला होता. त्या उपक्रमावर झालेला खर्च मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी हा कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करत होता . त्यावर शाळेतील ऐका शिक्षिकेने तीव्र हरकत घेतली. त्यांनी मुख्याध्यापकाला ऐक हजार रुपयांची रक्कम देण्यास नकार दिला. यावर मुख्याध्यापक परदेशी याने पैसे दिल्याशिवाय हजेरी मास्टरवर सही करू देणार नसल्याचे बजावले. त्यामुळे तक्रारदार महिलेने काल धुळे एसीबीशी संपर्क साधला होता. तक्रारी नंतर एसीबीचे पथक कुसुंबा येथे गेले. त्यांनी तक्रारदाराची तक्रार नोंदणी घेतली. कालच तक्रारीची पूर्ण पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानुसार आज एसीबीने शाळा परिसरात सापळा रचला. सदर उपशिक्षिकेला मुख्याध्यापकांच्या कक्षेत ऐक हजाराची लाच देत असताना एसीबीने मुख्याध्यापक प्रदीप परदेशीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द धुळे तालुका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई धुळे एसीबीचे डीवायएसपी अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय हेमंत बेंडाळे, मंजितसिंग चव्हाण , रुपाली खांडवी , तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे , मकरंद पाटील , प्रशांत बागुल , संतोष पवारा, प्रवीण मोरे , प्रवीण पाटील , रामदास बारेला, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली