सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक पाहताच बालिकांच्या चेहऱ्यावर पसरला आनंद
कु.संस्कृती व ध्रुव कृष्णा लहाने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
छत्रपती संभाजीनगर : जयराज चव्हाण, कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच
सिल्लोड येथे नुकताच संपन्न झालेला मातृ-पितृ पुण्यस्मरण सोहळा,प्राचार्य नामदेवराव चापे यांचे अमृत महोत्सवी वर्ष व त्यानिमित्ताने कुमारी संस्कृती लहाने हिचा प्रथम व ध्रुव लहाने याचा सातवा वाढदिवस 500 गरीब बालिकांना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देऊन कन्यादान योजनेचे अनोख्या पद्धतीने वाटप करण्यात आले. शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळ तथा अखिल भारतीय वारकरी महासंघाचे सचिव कृष्णा लहाने यांनी हा राबवलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असाच म्हणावा लागेल. कृष्णा लहाने हे मागील पंधरा वर्षापासून आपला व आपल्या परिवाराचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करतात वृक्ष लागवड, शालेय गणवेश वाटप, शालेय साहित्य वाटप,राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव विविध अनाथालयांना महापंगत,आरोग्य शिबिरे, वृध्दांना चष्मे वाटप व यावेळेस 500 बालिकांना कन्यादान वाटप आदी उपक्रम ते राबवित आहे. तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने सिल्लोड वासियांसाठी प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सिल्लोड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राजश्री निकम, शिवसेनेचे युवा नेते तथा नगरपालिका सिल्लोड चे उपनगराध्यक्ष समीर सत्तार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे,रामेश्वर साखर कारखाना भोकरदन च्या संचालक मतकरताई, महामंडलेश्वर दयानंद महाराज शेलगाव, ब्रह्मलीन बालयोगी काशी गिरी महाराज आश्रम धानोरा चे सर्वानंद सरस्वती महाराज, शनी उपासक मंगरूळकर शास्त्री, अनाथांची माऊली रामेश्वर महाराज पवार ,प्राचार्य नामदेवराव चापे, पुंडलिक नाना चापे, देविदास महाराज हरिद्वार, आनंद गिरी महाराज वडेश्वर चिंचवड, कृष्णनाथ महाराज नाशिक, लालगिरी महाराज,रमेश कासलीवाल शिवराम साखळे, दत्ता भवर, सासमकर महाराज ,विश्वनाथ राऊत, संतोष देवरे, सुरेश सुलताने, रावसाहेब गोराडे ,भानदास सपकाळ ,आवटी महाराज गोळेगाव,गटनेते नंदकिशोर सहारे, प .स सदस्य नारायण बडक, माजी गट शिक्षणाधिकारी नारायण फाळके,डॉक्टर दिपाली भवर मनोज महाराज भाग्यवंत,संध्या लहाने दामोधर शेळके, कौतिकराव सोनवणे यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पिंगाळकर महाराज, शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी, कृष्णा लहाने मित्र मंडळाचे पदाधिकारी आदींनी मेहनत घेतली.सात दिवस माऊली वारकरी शिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांनी नित्यनेम हरिपाठात आपला सहभाग नोंदविला. दिनांक 12 मार्च व 16 मार्च रोजी देशभरातील साधू संतांच्या वतीने पुरुष व महिला भाविकांना 11000 सिद्ध रुद्राक्ष वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी,कृष्णा जैवाळ, शरद काकडे यांनी केले.
कृष्णा लहाने यांची समाजसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी - समीर सत्तार
शिव शारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने ही नियमित आपल्या परिवाराचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. याही वेळेस प्राचार्य नामदेवराव चापे यांचा अमृत महोत्सव त्या निमित्ताने गौरव ग्रंथाचे प्रकाशन तसेच संस्कृती व धृव लहाने यांच्या वाढदिवसानिमित्त 500 गरीब बालिकांना सुकन्या समृद्धी योजनेचे वाटप, सिल्लोड तालुक्यातील भाविकांना 11000 रुद्राक्षाचे साधू संतांच्या हस्ते केलेले वाटप, तसेच प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची सात दिवस संपन्न झालेली संगीतमय श्री राम कथा आदी उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असेच म्हणावे लागेल असे गौरवोद्गार सिल्लोड नगरपालिकेचे सिल्लोड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष समीर सत्तार यांनी ध्रुव लहाने व संस्कृती लहाने हिच्या वाढदिवस प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले.