Friday, 10/01/2025

पंढरीनाथ मुंडे यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी हिंगोली लोकसभा संयोजक पदी निवड

हिंगोली : हिंगोली येथील भाजपा ज्येष्ठ नेते पंढरीनाथ मुंडे साहेब यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी हिंगोली लोकसभा संयोजक पदावर निवड करण्यात आली आहे. श्री पंढरीनाथ मुंडे साहेब यांच्या निवडीनंतर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 भाजपा कार्यकारिणी वरिष्ठ स्तरावरून सोपविण्यात आलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पूर्ण करेल असा विश्वास श्री  पंढरीनाथ मुंडे साहेब यांनी व्यक्त केला आहे.