Friday, 10/01/2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर येथे लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीची आढावा बैठक

ठाणे : श्री. संकेत सानप - मंत्रालय प्रतिनिधी, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच (महाराष्ट्र राज्य) : 

पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर येथे लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीची आढावा बैठक प्रदेश महामंत्री मा. श्री. विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल संपन्न झाली. यावेळी महामंत्री महोदयांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

या बैठकीत देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन उपस्थितांना केले आणि सर्वांशी संवाद साधून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधला. 

याप्रसंगी आमदार श्री. बबनराव पाचपुते, आमदार श्री. राम शिंदे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, माजी मंत्री श्री. शिवाजीराव कर्डिले साहेब, प्रदेश सचिव श्री. अरुण मुंडे, लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. बाबासाहेब वाकळे, जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष श्री. अभय आगरकर, श्री विठ्ठल लंघे,प्रदेश सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, मा. शहराध्यक्ष श्री. महेंद्र गंधे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अक्षय कर्डिले, श्री. विनायकराव देशमुख, पारनेरचे विधानसभा प्रमुख श्री. विश्वनाथ कोरडे, प्रदेश सदस्य श्री. भानुदास बेरड, प्रदेश सदस्य श्री. विवेक नाईक तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते