Friday, 10/01/2025

मायक्रो फायनान्स कंपन्याकडून ग्राहकांची खिसे कापण्याचा प्रकार उघडकीस

शुभम एस. तारु, संपादक-जिंतुर तालुका, मो. ८००७७३५८१६

स्वमान व इतर मायक्रो फायनान्स कंपन्या खेड्यापाड्यांमध्ये प्रोसेसिंग फी च्या नावाखाली ग्राहकांचे खिसे कापत आहेत. मुबलक प्रमाणात पैसे घेउन क्लेमच्या वेळेस चुकीची माहिती देउ*न ग्राहकांची फसवणूक करत आहेत. या प्रकारांमध्ये खेड्यापाड्यातील असुशिक्षित व बेरोजगार तरुण, महिला बचत गट तसेच शेतकर्‍यांचे प्रमाण जास्त आहे. फायनान्स कंपन्यांकडुन कर्ज वाटप करीत असताना मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग फी व इन्शुरन्स या नावाखाली सुरुवातीलाच पैशाची मागणी केली जाते. कर्जाच्या पोटी ग्राहक ते पैसे देतात व ज्यावेळी त्यांचे इन्शुरन्स क्लेम करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांच्याकडून वेगवेगळे कागदपत्रांची मागणी करण्यात येते. कागदपत्रांची पुर्तता करुनही ग्राहकांना नाहक वेटींगवर ठेवण्यात येते आणि कर्ज वेळेवर उपलब्ध करुन दिले जात नाही. जिंतुर तालुक्यातील अनेक ग्राहकांच्या बाबतीत असे घडले असुन या फायनान्स कंपन्यांकडुन ग्राहकांना नाहक वेठीस धरण्यास येत असल्याचे चौकशीत उघड झाले आहेत.