अहमदनगर : श्री. महेंद्र मगर, उपसंपादक- अहमदनगर जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
आज दि. 22 मार्च 2024 रोजी ग्रामीण पोलीस ठाणे वैजापूर येथे खोट्या चोरीच्या आरोपावरून सागर वाघडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .भटक्या समाजातील तरुण *सागर वाघडकर* *बजरंग गरड* *किरण गजर* या तीन तरुणास खोटा चोरीचा आरोप घेऊन त्यांना बेदम जीवहाणी होईल असा मारहाण केली.चोरी केली कबूल होत नाही म्हणून त्यांना सकाळ 10 पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोडाऊनच्या शेटर मध्ये कोंडून ठेवण्यात आले तसेच त्यांना जीव मारण्याची धमकी देत होते माणुसकीला काळिमा फासणारी असे तेथील नालायक क्रूर व्यक्तिंनी समूहाने कृत्य केले.*अगदी राईन पाड्यासारखे* कुठलाही विचारपूस न करता त्यांचे ओळखपत्र न बघता त्यांची शहानिशा न करता भटका समाज अजून नालायक क्रूर माणसाची शिकार बनतोय.. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी
यावेळी उपस्थित मा.ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव (वंचित बहुजन आघाडी नेते) मा.सखाराम शिणगारे (वंचित बहुजन आघाडी ता. उपाध्यक्ष वैजापूर ) मा.जाकिर पठाण (वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष वैजापूर) मा.अंकुश पठारे,अरुण सोनवणे,सुदाम पाटील,दौलत पाटील,काशिनाथ वायकर नारायण गदाई पाटील,संतोष चव्हाण संभाजी वायकर,रंगनाथ वाघडकर,अमोल गजर,ताराचंद साळवे बाबासाहेब वाघ ,राहूल साळवे,आनंद जाधव,उपस्थित होते
मा.कौटाळे साहेब पोलीस निरीक्षक अधिकारी वैजापूर म्हणाले सखोल तपास करून कोणावरही अन्याय होणार नाही असे काम केले जाईल अशी हमी भटक्या मुक्ताच्या शिष्टमंडळास दिली.तसेच पाटील साहेब म्हणाले गुन्ह्याची चौकशी करून विनाकारण अन्याय होणार नाही या पद्धतीचा तपास करू .