Friday, 10/01/2025

सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथे हनुमान जयंती उत्साहाने साजरी

नवनाथ नारायण धोत्रे, संपादक-वरुड चक्रपान सर्कल, मो. ९३५६७५४८६४

सावरखेडा या गावामध्ये श्री हनुमान जयंती सोहळा मोठया प्रमाणात साजरा करतात. भागवत पारायण, कीर्तन, भजने, हरीपाठ, काकडा असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. गावामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी श्रीराम नवमी ते हनुमान जयंती उत्साह पार पडला. आज सप्ताहचा शेवटचा दिवस होता. म्हणुन गावामध्ये श्री. भागवत पोथीची मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली होती. यामध्ये गावातील तरुणांनाचा व पुरुष, महिला,बालके तसेच भजनी मंडळी इ.सहभागी झाले होते. यामध्ये भजनांच्या स्वरात अनेक लहान मोठ्या महिलांनी फुगडी खेळण्यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे गावातील महिला सरपंच दुर्गा भारत मुंढे यांनी फुगडी खेळत महीलाचे लक्ष केंद्रित केलं. अशा प्रकारे गावात हनुमान जयंती उत्साह साजरा करण्यात आला.