Friday, 10/01/2025

सिल्लोड शहरात सुप्रसिद्ध सिनेगायक साजन-विशाल प्रस्तुत भीम गीतांचा कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : जयराज चव्हाण, कार्यकारी संपादक - महाराष्ट्र राज्य, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सिल्लोड शहरात  सुप्रसिद्ध सिनेगायक साजन - विशाल प्रस्तुत भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात साजन विशाल यांनी सादर केलेल्या भीमगीतांना चाहत्यांनी भरभरून दाद दिली. ना. अब्दुल सत्तार यांच्यासह आलेल्या मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. ना. अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी साजन - विशाल यांनी गायलेल्या गीतांचे कौतुक करीत उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, मा.उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, राजश्रीताई निकम, जुम्मा खा पठाण, विशाल जाधव, संजय आरके, जितेंद्र आरके, अमित आरके , मतीन देशमुख, राजेश्वर आरके, मनोहर आरके यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.