Friday, 10/01/2025

वन बुलढाणा मिशन अंतर्गत बुथ कार्यशाळा कार्यक्रम संपन्न

शेगाव : उल्हास खंडारे, संपादक-बुलडाणा जिल्हा, मासिक ग्रामपंचायत आणि सरपंच :
आज दि,16 मार्च 2024 रोजी वन बुलढाणा मिशन अंतर्गत बूथ कार्यशाळा कार्यक्रम पार पडला.
या कार्यशाळेमध्ये संपूर्ण बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी विविध बूथ स्थापन करण्यात आले आणि यामध्ये बूथ प्रमुख यांचे निवड करून यामध्ये त्यांना पदभार देण्यात आला.
राजर्षी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचालक संदीप दादा शेळके यांना आपले उमेदवार बुलढाणा लोकसभा मतदार संघातून जाहीर केलेली आहे त्याकरिता त्यांच्या वन बुलढाणा मिशनच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शेगावमध्ये आज कार्यशाळा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रममध्ये मतदारांचा आणि जनतेच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसायला मिळाला आणि हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवताना आज वन बुलढाणा मिशन दिसायला मिळाले. या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक आणि त्यांच्या अथांग प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम आयोजित केला असे शेगाव तालुका प्रमुख अजाबराव निंबाळकर यांनी वन बुलढाणा मिशन हे घरोघरी पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजाबराव निंबाळकर यांच्या प्रयत्नाने आज वन बुलढाणा मिशन चा कार्यशाळा कार्यक्रम पार पडला. यावेळी वन बुलढाणा मिशनचे तालुका आणि जिल्हा कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.